जगभरात अनेक विचित्र लोक असतात, त्यांच्या कारनाम्यांमुळे त्यांच्याबरोबरच दुसरी लोक देखील अडचणीत सापडतात. असेच, एक प्रकरण समोर आले असून, यामध्ये त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. त्या व्यक्तीला कारवर मातीचा ढीग लावल्याने अटक केले आहे. ही घटना घडली त्यावेळी तेथे त्या व्यक्तीची गर्लफ्रेंड देखील उपस्थित होती.
प्रेयसीने उत्तर न दिल्यामुळे प्रियकराने उचलले हे पाऊल
ओकालूसा काउंटी शेरिफ कार्यालयाने फेसबूकवर पोस्ट करत लिहिले की, हंटर मिल्स नावाच्या व्यक्तीला गुंडगिरी केल्याने अटक करण्यात आली आहे. पोलिसांनुसार, 20 वर्षीय मिल्सने गर्लफ्रेंडला तो काम करत असलेल्या क्रेस्टव्यू या ठिकाणी बोलवले होते.
मिल्सची गर्लफ्रेंड येताना दुसऱ्याची 2010 चे मॉडेल कॅडिलेक कार घेऊन आली. दोघांनी गप्पा मारण्यास सुरूवात केली. मात्र मिल्सच्या एका प्रश्नाचे उत्तर गर्लफ्रेंडने न दिल्याने त्याला राग आला व त्याने त्या कारवर फ्रंड-एंड लोडरने माती टाकण्यास सुरूवात केली.
पोलिसांनी मातीने भरलेल्या कारबरोबर मिल्सचा फोटो शेअर केला. कारच्या खिडक्या उघड्या असल्याने सेंटर कंसोल आणि एअर वेंटमध्ये माती गेल्याने 1 हजार डॉलर (71 हजार रूपये) नुकसान झाले.