पँरिसमध्ये जगातील सर्वात मोठे रूफटॉप फार्म म्हणजेच छतावरती फार्म बनवण्यात आले आहे. हे फार्म पुढील वर्षी सुरू होणार आहे. सांगण्यात येत आहे की, यातून दरवर्षी हजारो लोकांसाठी अन्न मिळेल. पँरिसच्या दक्षिण-पश्चिम भागात 459317 वर्ग फुट (14,000 वर्ग मीटर) चा हा फार्म बनवण्यात येत आहे. या फार्मचे व्यवस्थापन करण्यासाठी 20 माळींची नेमणूक करण्यात आली आहे. हे माळी येथे वेगवेगळी 30 झाडे लावणार आहेत. या फार्मला फार्मिंग कंपनी एग्रीपोलिसने बनवले आहे. त्यांनी दावा केला आहे की, या फार्ममधून दररोज एक हजार किलो फळ आणि भाज्या मिळतील.
कंपनीने शहरातील लोकांना फार्मिंगबद्दल शिक्षित करण्यासाठी वर्कशॉपचे देखील आयोजन केले होते. तसेच कंपनीने लोकांना आग्रह केला आहे की, छताचा एक भाग गार्डनिंगसाठी नक्की ठेवावा.
एग्रीपोलिसच्या डेव्हलपर्सनी सांगितले की, त्यांनी या फार्मला वर्टिकल फार्मिंग तंत्रज्ञानाद्वारे बनवले आहे. यामुळे या फार्ममध्ये कोणत्याही प्रकारच्या पेस्टीसाइडची आवश्यकता नसेल. तसेच पाण्याची देखील कमी आवश्यकता असेल. एग्रीपोलिसचे संस्थापक पास्कल हार्डी यांनी सांगितले की, ‘पुढील काळात शहरातील प्रत्येक छतावर या नवीन तंत्रज्ञानाद्वारे फार्मिंग करण्याचा आम्ही विचार करत आहोत. आमचे लक्ष्य हे या फार्मद्वारे सतत उत्पादनाचे मॉडेल जगासमोर ठेऊ.’