प्रथम शब्द सांगतो तुमचे व्यक्तिमत्व


एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, त्याची स्वभाव वैशिष्ट्ये जाणून घ्यायची असल्यास ‘पर्सनॅलिटी टेस्ट्स’ हे एक अतिशय प्रभावी माध्यम आहे. अशीच एक पर्सनॅलिटी टेस्ट आम्ही तुमच्याकरिता घेऊन आलो आहोत. या टेस्टमध्ये इंग्रजीतील अक्षरे लिहिलेले एक ‘ग्रिड’ आपण पाहू शकता. या ‘ग्रिड’ मधील अक्षरे जोडून अनेक शब्द तयार होऊ शकतात. मात्र हे ग्रिड पाहताक्षणी तुमच्या मनामध्ये अक्षरांची जुळणी करून सर्वप्रथम कोणता शब्द तयार होतो हे पाहून त्या शब्दावरून तुमचे व्यक्तिमत्व जोखणारी अशी ही टेस्ट आहे. हे ग्रिड पाहताक्षणी तुमच्या मनामध्ये ‘LION’ हा शब्द सर्वप्रथम आला असल्यास तुमचे व्यक्तिमत्व इतरांना प्रभावित करणारे आहे. अश्या व्यक्ती गत आयुष्यातील चुका किंवा वाईट घटना आठवत न बसता, आपल्या ध्येयाकडे सातात्याने वाटचाल करीत असतात. अधून मधून या व्यक्ती निराश, हताश होतात खऱ्या, पण या व्यक्तींचा मुळातच आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असल्याने या व्यक्ती फार काळ नैराश्याच्या गर्तेत रहात नाहीत. मात्र या व्यक्तींच्या हातून क्वचित अतिउत्साहाच्या भरात काही चुका घडण्याची शक्यता असते.

ज्या व्यक्तींना ग्रिड पाहिल्यानंतर सर्वप्रथम ‘FRUIT’ हा शब्द आढळला, त्या व्यक्ती इतरांना मदत करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. त्यांच्या या स्वभावाचा अनेक गैरफायदाही घेतला जातो, पण तरीही या व्यक्तींचा इतरांना मदत करण्याचा स्वभाव कायम असतो. या व्यक्तींचे खासगी जीवनही अतिशय शांततामय असते. ग्रिडमध्ये ‘COFFEE’ हा शब्द सर्वप्रथम दिसलेल्या व्यक्ती काहीश्या स्वप्नाळू स्वभावाच्या म्हटल्या पाहिजेत. या व्यक्ती स्वतःच्याच भावविश्वात गुरफटलेल्या असतात. या व्यक्तींना कलात्मक गोष्टींमध्ये विशेष रुची असते. या व्यक्ती मुळात प्रतिभावान असल्या तरी यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता असू शकते, त्यामुळेच मनासारख्या संधी मिळूनही या व्यक्तींना त्या संधीचे सोने करता येतेच असे नाही. आजकाल या व्यक्ती काहीश्या निराश मनस्थितीमध्ये असू शकतात.

ज्या व्यक्तींना सर्वप्रथम ‘RAINBOW’ हा शब्द आढळला आहे, त्या व्यक्ती अतिशय शिस्तबद्ध आणि ठराविक गोष्टी ठराविक पद्धतीने करणाऱ्या असतात. त्यांच्या या शिस्तीमध्ये जरा सुद्धा बदल यांना सहसा मानवत नाही. या व्यक्तींचे वर्तन शिस्तप्रिय असले, तरी या व्यक्ती स्वभावाने अतिशय प्रेमळ असल्याने इतर लोक यांच्यासमोर आपले मन मोकळे करण्यास कचरत नाहीत. ‘NATURE’ हा शब्द सर्वप्रथम आढळलेल्या व्यक्ती स्वभावाने अतिशय प्रामाणिक आणि परखड असतात. कोणतीही गोष्ट स्पष्टपणे बोलून दाखविणे हे यांचे स्वभाववैशिष्ट्य असते. मात्र त्यांचा हाच स्वभाव काहींना न आवडण्याची शक्यता असते. या व्यक्ती एखादा निर्णय घेताना क्वचित अतिशय गोंधळून जातात. तसेच जर अनेक पर्याय असले, तर नेमका कोणता पर्याय निवडायचा हे देखील या व्यक्ती सहज ठरवू शकत नाहीत.

‘EXPLORER’ हा शब्द जर एखाद्याला सर्वात आधी दिसला असेल, तर ती व्यक्ती स्वतःच्या बाबतीत अतिशय नकारात्मक विचार करणारी असते. त्यामुळे आपण काही चांगले करू शकू या गोष्टीवर त्यांचा विश्वासच नसतो. त्यामुळे समोर चालून आलेल्या उत्तम संधी देखील यांच्या हातून निसटण्याची शक्यता अधिक असते. अश्या व्यक्तींनी स्वतःबद्दल, स्वतःच्या क्षमतांबद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. ‘ROOT’ हा शब्द सर्वप्रथम दिसणाऱ्या व्यक्तींचा स्वभावही काहीसा नकारात्मकच आहे. या व्यक्तींचा स्वतःवर, स्वतःच्या क्षमतांवर म्हणावा तसा विश्वास नसला तरी इतरांना या व्यक्तीबद्दल अतिशय जिव्हाळा आणि खात्री असते.

या व्यक्तींसाठी पर्यटनक्षेत्रामध्ये उत्तम संधी असतात. ग्रिड मध्ये सर्वप्रथम ‘DEPTH’ हा शब्द दिसलेल्या व्यक्ती अतिशय महत्वाकांक्षी असतात. त्यांनी मनामध्ये जो निश्चय केला, तो पूर्णत्वाला जाईपर्यंत या व्यक्ती स्वस्थ बसत नाहीत. अश्या व्यक्तींच्या स्वभावाचे इतरांवर दडपण येण्याची शक्यता असते. मात्र या व्यक्ती महत्वाकांक्षी असल्या, तरी स्वभावाने प्रेमळ, समजूतदार असतात. ‘SILK’ हा शब्द जर एखाद्याला सर्वप्रथम दिसला असेल, तर या पर्सनॅलिटी टेस्टच्या अनुसार या व्यक्ती अधिक क्रियाशील असतात. कोणतेही काम करताना साध्या, सरळ धोपटमार्गाने जाणे यांना मुळीच पसंत नसते. या व्यक्तींना नाविन्याची आवड असून, कुठलीही गोष्ट ठरल्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने करून पाहण्याकडे त्यांचा कल असतो. या व्यक्ती काहीश्या उतावळ्या स्वभावाच्या असतात. अश्या व्यक्तींनी स्वतःच्या अंगी थोडा संयम बाळगणे आवश्यक असते.

Leave a Comment