प्रेयसीच्या प्रेमाची खात्री करून घेण्यासाठी अब्जाधीशाने योजला अजब उपाय


एखाद्या सुंदर स्त्रीने केवळ पैश्यांच्या मोहापायी एखाद्या वृद्ध अब्जाधीशाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याशी विवाह केला असल्याच्या अनेक कथा आपण चित्रपट, कादंबऱ्या आणि टीव्ही मालिकांच्या रूपात आणि क्वचित प्रत्यक्षातही पहात असतो. मात्र एका ब्रिटीश अब्जाधीशाच्या मनावर या कथांचा इतका प्रभाव पडला आहे, की नव्याने प्रेमात पडल्यानंतर त्याच्यापेक्षा वयापेक्षा वयाने बरीच लहान असलेली त्याची प्रेयसी, केवळ त्याच्या धनदौलतीच्या मोहापायी तर त्याच्याशी विवाहबद्ध होऊ पहात नाही ना, अशी शंका त्याला सतावीत आहे. आपल्या प्रेयसीच्या प्रेमाची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी त्याने ‘हशहश डॉट कॉम’ या वेबसाईटकडे मदतीची याचना केली आहे.

या अब्जाधीशाने केलेल्या विनंतीनुसार वेबसाईटच्या वतीने एका तरुणाची नियुक्ती केली जाऊन हा तरुण या अब्जाधीशाच्या प्रेयसीला वश करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्या प्रेयसीच्या प्रेमाची सत्यासत्यता त्याला यावरूनच पटणार आहे. जर त्याची प्रेयसी या रुबाबदार तरुणाला वश झाली, आणि इतने त्याच्याशी प्रेमसंबंध जोडले, तर आपल्याशी केवळ आपल्या दौलतीखातर तिने विवाह करण्याची तयारी दर्शविली असल्याची खात्री या अब्जाधीशाला पटणार आहे. आपल्या प्रेयसीला वश करून तिच्या आपल्यावरील प्रेमाची सत्यासत्यता पटवून देणाऱ्या तरुणाला हा अब्जाधीस पंधरा हजार पाउंड्स, एक आलिशान घर आणि गाडी असे भरघोस इनामही देणार आहे !

एखाद्या सुंदर तरुणीच्या प्रेमात पडण्याची हा अब्जाधीशाची ही पहिलीच वेळ नाही. पण आजवर त्याच्या प्रेमात पडलेल्या तरुणींना वास्तविक केवळ त्याच्या दौलतीचा मोह असल्याचे त्याच्या लक्षात आल्याने आता त्याच्याशी विवाहबद्ध होऊ इच्छीणाऱ्या तरुणीचे त्याच्यावरील प्रेम प्रामाणिक आहे किंवा नाही याची खात्री त्याला करून घ्यायची आहे, आणि त्यासाठीच हा अजब उपाय त्याने योजला आहे.

Leave a Comment