हातावरील ही रेषा देते प्रेमविवाहचे संकेत


तुमच्या हातांच्या रेषांवर तुमचे नशीब अवलंबून असते असे नेहमी म्हटले जाते. शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे की, तुमच्या हाताच्या रेषा तुमचे भविष्य आणि वर्तमान सांगते. प्रत्येक व्यक्ती हाताच्या रेषांवरून हे जाणून घेऊ इच्छितो की, भविष्यात त्याच्याबरोबर काय होणार आहे. याच रेषांच्यामध्यभागी एक अशी रेषा असते जी सांगते की, तुमचे लव्ह मँरेज होणार आहे की अरेंज मँरेज. चला तर जाणून घेऊया मग या हस्त रेखाबद्दल.

जर एखाद्या व्यक्तीच्या हाताची लग्नाची रेखा आणि ह्रदयाची रेखा यामधील अंतर खूप कमी असेल तर अशा लोकांचा विवाह कमी वयात होण्याची शक्यता असते. जर विवाह रेषेची सुरूवात पर्वताच्या चिन्हाद्वारे होत असेल तर अशा स्त्रीचे लग्न चुकीच्या व्यक्तीबरोबर होत आहे.

तसेच विवाह रेषा ह्रदय रेषेच्या खूपच जवळ असेल तर तुमचे 20 वर्षांच्या आधीच लव्ह मँरेज होण्याची शक्यता आहे.

एखाद्या व्यक्तीच्या हातात विवाह रेषा ह्रदय रेषेला कापत खाली जात असेल तर ही चांगली गोष्ट समजली जात नाही. या व्यक्तीला नेहमीच लव्ह मँरेज होण्याची चिंता सतावत असते.

जर विवाह रेषेच्या जवळ त्रिशुल सारखे एखादे चिन्ह दिसत असेल तर ती व्यक्ती लव्ह मँरेज करते आणि आपल्या साथीदारावर खूप प्रेम करते.

विवाह रेषेवर वर्गप्रमाणे चिन्ह असेल तर लव्ह मँरेज होण्याची शक्यता असते, मात्र साथीदाराचे आरोग्य खराब होण्याची शक्यता असते.

Leave a Comment