युरोपच्या ५३ देशात वेगाने वाढतोय करोना

सध्याच्या काळात भारतात करोना केसेस मध्ये घट दिसत असली तरी रशिया आणि चीन मध्ये करोना पुन्हा उग्र रूपात दिसत आहेच पण युरोपीय देशात करोना धोकादायक पातळीवर आणि अतिशय वेगाने हातपाय पसरत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. त्यामुळे भारतात सुद्धा पुन्हा एकदा करोना उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी करोना प्रतिबंध नियमांचे पालन करणे केव्हाही श्रेयकर असल्याचे वैद्यकीय तज्ञ सांगत आहेत.

कोविड १९ प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले नागरिक सुद्धा पुन्हा संक्रमित होत आहेत हा चितेचा विषय आहे असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. युरोपच्या प्रमुख क्षेत्रात करोना केसेस, संक्रमण आणि मृत्यू संख्येत गेल्या आठवड्यात वाढ दिसून आली असून ५३ देशात करोना केसेस वाढल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या साप्ताहिक रिपोर्ट नुसार करोनामुळे होणाऱ्या मृत्युदरात युरोपीय देशात १४ टक्के वाढ दिसून आली असून १६ लाख नव्या केसेस समोर आल्या आहेत आणि २१ हजाराहून अधिक मृत्यू झाले आहेत.

गेल्या सात दिवसात या क्षेत्रात ५,१३,००० नवे रुग्ण अद्घाळले असून पूर्व युरोप मधील अनेक देशात संक्रमणात वाढ दिसून आली आहे. त्यांमुळे तेथे पुन्हा निर्बंध लागू केले गेले आहेत. रोमानिया, लातविया येथे हा दर अधिक असून लातविया पूर्व युरोप मधील लॉकडाऊन लागू करणारा पाहिला देश ठरला आहे. संपूर्ण युरोप मध्ये लसीकरणाचे प्रमाण ७४.६ टक्के आहे मात्र पूर्व युरोप देशात हे प्रमाण अवघे २४ टक्के आहे. रोमानियात करोना मृत्युदर सर्वाधिक असून तो १० लाख मागे १९.२५ मृत्यू असा आहे.

युक्रेन मध्येही संक्रमित संखेत वाढ झाली असून गुरुवारी संक्रमिताची सरासरी रोज २२४१५ संक्रमितांवर पोहोचली आहे. भारताच्या काही राज्यात करोना संक्रमितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याचे दिसून आले आहे. ब्रिटन मध्ये सापडलेला नवा करोना स्ट्रेन भारताच्या काही राज्यांसह महाराष्ट्रात सुद्धा दिसून आला आहे.