सुनील शेट्टीच्या मुलाच्या ‘तडप’ चा टीझर रिलीज


अनेक वर्ष आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी प्रेक्षकांची मने जिंकत आहे. सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी हिने देखील हिरो चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. आता सुनिल शेट्टीचा मुलगा अहानने देखील बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. नुकताच अहानच्या ‘तडप’ या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपट निर्मात्यांनी हा टीझर रिलीज करून चित्रपटाची रिलीज डेट देखील घोषित केली आहे. त्याचबरोबर आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे.


प्रेक्षक तडप चित्रपटाचा टीझर पाहून चित्रपटासाठी उत्सुक झाले आहेत. तडपचा टीझर चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. चित्रपटामध्ये अहानसोबत अभिनेत्री तारा सुतारिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. टीझर पाहून असे लक्षात येते की या चित्रपटाचे कथानक हे एका प्रेमकथेवर आधारित आहे. 3 डिसेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. मिलन लूथरियाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहेत. आता ‘तडप’ या आगामी चित्रपटामध्ये तारा आणि अहानची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.