रोहित शेट्टीने रणवीरला दिली ‘सूर्यवंशी’मधून सीन कापण्याची धमकी


छोट्या पड्दयावरील लोकप्रिय शोपैकी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा ‘द बिग पिक्चर’ हा शो एक आहे. सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटी देखील शोमध्ये हजेरी लावतात. या विकेंडला ‘दिवाळी स्पेशल’ या एपिसोडमध्ये बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीने हजेरी लावली आहे. यावेळी ‘सूर्यवंशी’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी रोहित शेट्टी येत आहे. रणवीरची या चित्रपटात पाहूण्या कलाकाराची भूमिका आहे. रोहितने यावेळी रणवीरला त्याचा सीन चित्रपटातून काढून टाकण्याची धमकी दिली आहे.


आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंवरून कलर्सने ‘द बिग पिक्चर’चा प्रोमो शेअर केला आहे. एका प्रश्नाचे उत्तर रोहित शेट्टीला येत नव्हते. दरम्यान, रणवीरकडे रोहितने मदत मागितली. रणवीरने त्यासाठी नकार दिला. त्यानंतर रोहित रणवीरला धमकी देत म्हणाला ‘चित्रपट अजुन रिलीज झाला नाही…तुझा सीन कट करून टाकेन. त्यावर नको नको सर अशी विनंती रणवीर करू लागला.

प्रोमोवरुन असे कळते की ‘सूर्यवंशी’ची पोलीसांची थीम लक्षात ठेवता सर्व प्रेक्षक हे पोलीसांच्या वेषात बसले आहे. या आधी रोहितने पोलीसांवर आधारित तीन चित्रपट होते. अजय देवगनसोबत त्याने ‘सिंघम’, ‘सिंघन रिटर्न्स’ आणि रणवीर सोबत ‘सिंबा’ हा चित्रपट बनवला. आता रोहित ‘सुर्यवंशी’ हा चौथा चित्रपट बनवत आहे. या चित्रपटात अक्षय आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.