प्रभासने वाढदिवशी रिलीज केला बहुचर्चित ‘राधे श्याम’चा नवा टीझर


आज २३ ऑक्टोबर रोजी दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा वाढदिवस आहे. प्रभास काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्याचा ४२वा वाढदिवस साजरा करणार आहे. दरम्यान, प्रभासने आपल्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. आगामी चित्रपट ‘राधे श्याम’चा नवा टीझर त्याने शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा टीझर चर्चेत आहे. या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे दिसणार आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रभासने ‘राधे श्याम’चा टीझर शेअर केला आहे. या १ मिनिटे १८ सेकंदाच्या टीझरमध्ये अभिनेत्री पूजा हेगडेची देखील झलक पाहायला मिळाली. टीझरमध्ये प्रभास एकदम वेगळ्या अंदाजात दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रभास आणि पूजाचा रोमांस पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ‘राधे-श्याम’ हा चित्रपट राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित बहुभाषिक चित्रपट आहे. गुलशन कुमार आणि टी-सीरिज याचे सादरीकरण करणार आहेत. या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे. हा चित्रपट जानेवारी २०२२मध्ये प्रदर्शित होणार आहे.