राज्यातील चित्रपटगृहांना सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतर सिनेसृष्टीत आता पुन्हा एकदा नवचैतन्य पाहायला मिळत आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा गेल्या काही दिवसांपासून सलग जाहीर केल्या जात आहे. दरम्यान सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर आता त्याचा आगामी चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. जगभरातील चित्रपटगृहात येत्या २६ नोव्हेंबर २०२१ ला ‘अंतिम’ रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे आणखी एक मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. यात अभिनेता आयुष शर्मा खतरनाक लूक पाहायला मिळत आहे.
सलमान खानच्या आगामी ‘अंतिम’चे आणखी एक मोशन पोस्टर रिलीज
अभिनेता आयुष शर्मा देखील सलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. सलमानने या चित्रपटाचे नुकतेच आणखी एक मोशन पोस्टर रिलीज केले आहे. यात मोशन पोस्टरमध्ये आयुष शर्मा हा शर्टलेस अवतारात पाहायला मिळत आहे. आयुषची जबरदस्त बॉडी, अॅब्स आणि मसल्सही यात पाहायला मिळत आहे. त्यासोबत त्याच्या गळ्यात सोन्याची चेन पाहायला मिळत असून त्यावर आर अक्षर असलेले लॉकेट दिसत आहे. आयुषचा हा लूक पाहून अनेकांनी खतरनाक, जबरदस्त अशा अनेक कमेंट केल्या आहेत. अंतिम मे जब राहुल बना राहुलिया, थिएटर्स भी खुल गये, असे कॅप्शन सलमानने या पोस्टरला दिले आहे.
Antim mein jab Rahul bana Rahulia theatres bhi khul gaye… #AayushAsRahulia#AayushSharma @MahimaMakwana_ @manjrekarmahesh @SKFilmsOfficial @ZeeStudios_ @ravibasrur @ZeeMusicCompany @ZeeCinema @Zee5India pic.twitter.com/OtfHRD8Gvm
— Salman Khan (@BeingSalmanKhan) October 22, 2021
दरम्यान सलमानने काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. सलमानचा आगळावेगळा लूक यात पाहायला मिळत होता. त्यामुळे ते पोस्टर चर्चेचा विषय ठरत होते. यानंतर आता आयुषचे हे मोशन पोस्टर चांगलेच व्हायरल होत आहे. येत्या २६ नोव्हेंबर २०२१ ला जगभरातील चित्रपटगृहात ‘अंतिम’ रिलीज होणार आहे. हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल, अशी मला आशा असल्याचे कॅप्शन सलमानने या मोशन पोस्टरला दिले आहे.
‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. गेल्यावर्षी १६ नोव्हेंबरपासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले. त्यावेळी फक्त आयुष शुटिंग करत होता. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे.