गोंदिया येथील नाट्यगृहासाठी सुधारित प्रस्ताव तयार करा – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख


मुंबई : गोंदिया येथे नाट्यगृह बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून या नाट्यगृहाबाबतचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात यावा असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. गोंदिया येथील नाट्यगृहासंदर्भात बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी आमदार गोपालदास अग्रवाल, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले की, गोंदिया येथे अद्ययावत नाट्यगृह बांधण्यात येत असून या नाट्यगृहासाठी सुधारित प्रस्ताव तयार करण्यात यावा. सुधारित प्रस्ताव तयार करीत असताना मंजूर अनुदानाबरोबरच आवश्यक असलेले अनुदान याबाबतचीही माहिती सादर करण्यात यावी.