18 ते 20 टक्क्यांनी स्वस्त होणार Mercedes-Benz च्या आलिशान कार


पुणे – जर्मनीची लक्झरी कार बनविणारी कंपनी Mercedes-Benz च्या कार या महागड्या असतात हे काही आपल्याला नव्याने सांगायची गरज नाही. पण आता याच महागड्या गाड्या आता खूप स्वस्त होणार आहेत. कारण मर्सिडिज कार 20 टक्क्यांपर्यंत स्वस्त करण्याची तयारी कंपनीने केली आहे.

पुण्यातील चाकणमध्ये मर्सिडीजचा प्लांट आहे. तिथे गेल्या 10-12 वर्षांपासून कार बनविल्या जातात. पण बॉडी वगळता बाकी सारे काही बाहेरून आयात केले जाते. यामुळे मर्सिडिज-बेन्जच्या कारवर 110 टक्के कर लागतो. जगातील सर्वाधिक आयात कर वसूल करणार भारत हा देश आहे. बाहेरून आयात केल्या जाण्याऱ्या कारवर 110 टक्के म्हणजे जवळपास दुप्पट कर आकारला जातो. यामुळे परदेशातील वस्तू महाग असतात.

आता भारतातच कार असेम्बल करण्याचा निर्णय मर्सिडिजने घेतला आहे. कंपनी सध्या भारतात 9 मॉडेल्स असेम्बल करते. यामध्ये A35 आणि GLC43 Coupe चा देखील समावेश आहेत. पण आता मर्सिडीजच्या साऱ्याच कार, बस आदी चाकणमध्येच तयार करण्यात येणार आहेत.

येत्या काळात मर्सिडीज-बेन्ज AMG कारची असेम्ब्ली पुण्यात करणार आहे. यासाठी पुण्यात असेम्ब्ली लाईन कंपनीने बसविली आहे. मेक इन इंडिया कार अद्याप दूर असल्या तरी देखील कार येथेच जोडण्यात येणार असल्यामुळे खर्च कमी होईल आणि याचा फायदा म्हणजे कार 18 ते 20 टक्के स्वस्त होतील. 2025 पर्यंत आपल्या सर्व गाड्या Mercedes-Benz इलेक्ट्रीक करणार आहे. यामुळे पेट्रोल, डिझेलमध्ये कार बनविणे कंपनी बंद करणार आहे. या इलेक्ट्रीक गा़ड्यादेखील भारतातच बनविण्यात येणार आहेत.