तुम्ही पाहिला का सूर्यवंशी चित्रपटाचा भन्नाट टीझर ?


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिन कैफ यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख गेल्या काही दिवसांपासून पुढे ढकलण्यात येत होती. पण आता हा चित्रपट अखेर ५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, चित्रपटाचा भन्नाट टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अक्षय कुमारने ‘सूर्यवंशी’चा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत ‘येत्या दिवाळीमध्ये ५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये सूर्यवंशी हा रिलीज होणार आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे, अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.


‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रमोशनला येत्या २१ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. यादिवशी मोठे प्रमोशन केले जाणार आहे. याच दिवशी चित्रपटातील एक गाणेही लाँच केले जाणार आहे. या गाण्यात अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह हे तिघेही दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. तर २४ ऑक्टोबरला चित्रपटातील दुसरे गाणे रिलीज करण्यात येणार आहे. हे गाणे अक्षय कुमार आणि कतरिना कैफ या दोघांवर चित्रित करण्यात आले आहे.