वॉर्नर ब्रदर्सच्या ‘द बॅटमॅन’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज


हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट पॅटिनसन अभिनीत बहुप्रतिक्षित ‘द बॅटमॅन’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून ट्रेलरला मोठी पसंती मिळताना दिसत आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाची रिलीज डेट कोरोना महामारीमुळे पुढे ढकलली जात होती. पण अखेर आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे.

हा चित्रपट ४ मार्च २०२२ ला रिलीज होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट २०२१ सालामध्ये रिलीज होणार होता, पण कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. अखेर वॉर्नर ब्रदर्सने या चित्रपटाचा नवा ट्रेलर रिलीज करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. या ट्रेलरवरुनच चित्रपटामध्ये अ‍ॅक्शनचा खजिना पाहायला मिळणार आहे हे लक्षात येते. तर आपल्या दमदार अभिनयाने आणि अ‍ॅक्शनने रॉबर्ट पॅटिनसन प्रेक्षकांची पसंती मिळवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे.

या चित्रपटाची निर्मिती मॅट रीव्सने केली आहे. तर हा चित्रपट २१ जूनला रिलीज होणार होता. त्यानंतर ही तारीख बदलून १ ऑक्टोबर करण्यात आली होती. पण ऑक्टोबरमध्येही चित्रपटाचे प्रदर्शन रद्द करण्यात आले. अखेर ४ मार्च २०२२ला चित्रपट रिलीज होणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.