बाबा राम रहिमसह 5 दोषींना हत्येप्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा


चंदीगड : न्यायालयाने आज डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. राम रहिम सेवादार रणजितसिंह याच्या हत्येप्रकरणी दोषी ठरले होते. त्यानंतर आज त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. बाबा राम रहिम यांच्याबरोबरच त्यांच्या इतर पाच साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने राम रहीम यांना 31 लाख तर इतर चार आरोपींना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरमीत राम रहीम यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर इतर चार आरोपींना देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राम रहीम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना न्यायालयात 8 ऑक्टोबरलाच दोषी ठरवण्यात आले होते. पण न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज निकालाचे वाचन न्यायालयाकडून करण्यात आले. त्याआधी हरियाणाच्या पंचकूला जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच जिल्ह्यात कमल 144 लागू करण्यात आले आहे.

आपल्या दोन अनुयांयीवर बलात्कार केल्याच्या आरोपांखाली राम रहीम सध्या 20 वर्षाच्या कारावासाची शिक्षा भोगत आहे. त्याच्यावर अनेक आरोप आहेत. दरम्यान, राम रहीमशी संबंधित कोणत्या प्रकरणावर सुनावणी दरम्यान सुरक्षा व्यवस्था वाढवली जाते. कारण ऑगस्ट 2017 मध्ये मोठा हिंसाचार झाला होता. त्यावेळी राम रहीम न्यायालयात दोषी ठरला होता. त्यानंतर मोठा हिंसाचार झाला होता. त्या हिंसाचारात जवळपास 36 जणांचा मृत्यू झाला होता.

सीबीआयने गेल्या सुनावणीत न्यायालयाकडे बाबा राम रहीमला मृत्यदंडाची शिक्षा देण्याची विनंती केली होती. तर दुसरीकडे राम रहीमने रोहतक जेलमधून न्यायालयाकडे दयेची याचना केली होती. यासाठी त्याने ब्लड प्रेशर, डोळे आणि इतर आजारांचे कारण सांगितले होते. पण राम रहीमच्या याचिकेला सीबीआयने विरोध केला होता. पीडितेने त्याला देव माणले होते. पण आरोपीने तिच्याविरोधात चुकीचे कृत्य केले. याशिवाय त्याने अनेक गुन्हे केले आहेत. त्यामुळे त्याला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती.