गरब्यादरम्यान पंकजा मुंडेंकडून कोरोना नियमावलीचा फज्जा


परळी – बुधवारी परळीमध्ये गरब्याचा मनमुराद आनंद भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लुटला. सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर पंकजा मुंडे या आहेत. त्यांच्या उपस्थितीत येत्या १५ तारखेला भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. तत्पूर्वी पंकजा मुंडेंनी या ठिकाणी एका कार्यक्रमाला उपस्थित राहून गरबा दांडियाचा आनंद घेतला. सध्या सोशल मीडियात पंकजा यांचा हा गरबा चांगलाच चर्चेत आहे.

(व्हिडीओ सौजन्य – Janhitwadi)
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बुधवारी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यात आल्यानंतर बीडसह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पंकजा परळीत दाखल झाल्या. दसऱ्याला दोन दिवस राहिले असताना परळीत कार्यकर्त्यांच्या आग्रहखासतर पंकजा मुंडेंनी दांडियाला उपस्थिती लावली. यावेळी चिमुकल्याबरोबर गरबा खेळत पंकजा मुंडेंनी त्यांच्याशी संवाद साधला आहे. पण कोरोनासंदर्भातील नियमांचा त्याचवेळी या ठिकाणी फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. गरबा खेळताना पंकजा यांनी स्वत: मास्क लावला नव्हता, तसेच सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचे या कार्यक्रमाच्या व्हिडीओमधून दिसून येत आहे.