ट्विटप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली चित्रा वाघ यांची बाजू


मुंबई – सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या महिला आघाडीच्या नेत्यांमध्ये राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून कलगीतुरा रंगला आहे. चित्रा वाघ यांच्या ट्विटवर रुपाली चाकणकर यांनी देखील थेट टीका न करता अप्रत्यक्ष शब्दांतच निशाणा साधला आहे. राजकीय वर्तुळात या ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यात चित्रा वाघ यांची बाजू घेत प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या जुन्या अनुभवातून चित्राताई वाघ यांनी टीका केली असेल. पण उशिरा का होईना महिला अध्यक्ष नेमत आहेत, हे चांगले आहे. चित्राताई वाघ यांना रुपालीताई कशा आहेत हे माहिती असणार. यामुळे त्यांनी तसे ट्विट केले असेल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.