व्हिडीओ; टोपीवर तब्बल ७३५ अंडी ठेवत रचला जागतिक विक्रम


आपल्यापैकी कितीजण एका टोपी किती अंडी ठेऊ शकता? याचे तुमचे उत्तर एक, दोन किंवा जास्तीत जास्त तीन असे असेल. पण आम्ही आज तुम्हाला अशा विश्वविक्रमाबद्दल सांगणार जो ऐकूण तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका व्यक्तीने दोन-तीन नव्हे, तर त्याच्या टोपीच्या वर ७३५ अंडी ठेवून जागतिक विक्रम रचला आहे. त्याचा एक व्हिडीओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, जो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटते की या व्यक्तीने हे कसे केले असेल?


गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, ग्रेगरी दा सिल्वा एकाच कॅपच्या वर ७३५ अंडी घेऊन जात आहेत. ग्रेगरीबद्दल अधिक माहिती देताना, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने म्हटले आहे, गेग्री दा सिल्वा पश्चिम आफ्रिकेतील बेनिनचा रहिवासी आहे. चीनमध्ये सीसीटीव्हीसाठी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डच्या विशेष शो दरम्यान त्याने हा अनोखा विक्रम केला आहे. ग्रेगरीला हा महान विक्रम करण्यासाठी तीन दिवस लागले. व्हिडीओमध्ये, आपण ग्रेगरी अंड्यासह समतोल साधताना पाहू शकता.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर व्हायरल झाला आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ ८५ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे. ही संख्या सतत वाढत आहे. ग्रेगरीची ही थक्क करणारी कामगिरी पाहिल्यानंतर, नेटकरी सतत त्यांचे अभिप्राय देत आहेत. एका वापरकर्त्याने यावर कमेंट करताना लिहिले, हा खरोखरच एक महान रेकॉर्ड आहे. क्वचीतच कोणी तो मोडू शकतो. त्याचवेळी, दुसऱ्या एका नेटकऱ्याने प्रश्न विचारला आहे की ग्रेगरीने त्याच्या डोक्यावर जेवढी अंडी ठेवली आहेत त्याचे वजन किती असेल?