राजकुमार आणि क्रिती सेनॉनच्या आगामी ‘हम दो हमारे दो’चा ट्रेलर रिलीज


बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन ‘प्रेमासाठी आणि कुटुंबासाठी काही पण….’ असे म्हणत ‘हम दो हमारे दो’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमधील राज कुमार आणि क्रितीची केमेस्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच या चित्रपटात कॉमेडीचा तडकाही देण्यात आला आहे. क्रितीला इम्प्रेस करण्यासाठी राज कुमार या चित्रपटात भरपूर कष्ट घेताना दिसेल.

‘मीमी’, ‘बाला’, ‘लुक छुपी’ सारख्या चित्रपटांच्या यशानंतर दिनेश विजान प्रोडक्शन निर्मित ‘हम दो हमारे दो’ हा चित्रपट वेगळ्या कथानकावर आधारित आहे. आजच्या आधुनिक काळातील ही कथा आहे. क्रितीला ज्यात आई-वडील असलेल्या कुटुंबात लग्न करायचे असते. पण राज कुमारचे कुटुंब नसते, त्यामुळे तो खोट्या आई-वडिलांच्या शोधत असतो. यात परेश रावल आणि रत्ना पाठक शाह राजकुमारच्या खोट्या आई-वडिलांची भूमिका साकारताना दिसतील. त्यांच्या एन्ट्रीमुळे क्रिती आणि राज कुमारच्या आयुष्यात एक नवीन वळण येईल.

हा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते आता या चौघांची दमदार केमेस्ट्री पाहाण्यासाठी खूप उत्सुक आहेत. जरी हा कॉमेडी चित्रपट असला तरी दिग्दर्शक या चित्रपटाद्वारे एक महत्वाचा मेसेज देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. क्रीतीने हा ट्रेलर इन्स्टग्रामवर शेअर केला आहे. आमच्या ट्रेलरसोबत तुमची दिवाळी होणार फॅमिली वाली, आशयाचे कॅप्शन दिले आहे.

या चित्रपटात क्रिती सेनॉन आणि राज कुमार व्यतिरिक्त परेश रावल, अपारशक्ती खुराना, रत्ना पाठक आणि प्राची शाह देखील महत्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. तसेच हा चित्रपट दिवाळी दरम्यान म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. क्रीती आणि राज कुमारने याआधी बरेली की बर्फी या चित्रपटात काम केले आहे. पण त्या चित्रपटात राज कुमार सहायक कलाकार होता. त्यामुळे आता क्रितीसोबत त्यांची केमेस्ट्री पाहाण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.