अमृता फडणवीसांच्या टीकेला रुपाली चाकणकरांचे प्रत्युत्तर


पुणे – महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील घटनेच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला भाजपने विरोध केला आहे. लखीमपूर घटनेला जालियनवाला बाग म्हणताना जेव्हा मावळमध्ये गोळीबार झाला, तेव्हा जालियनवाला बाग आठवले नाही का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. तर अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदवरुन सरकारला खोचक टोमणा लगावला. त्यावरुन, आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.


राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी घटनेविरुद्ध बंद पुकारला आहे. भाजपने महाविकास आघाडीच्या या बंदला विरोध केला आहे. तर, अमृता फडणवीस यांनी बंदवरुन थेट निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो, तसे त्यांच्या बोलण्यातसुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो? संवेदनाहिन मनाचे आणि अर्धवट ज्ञानाचे परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी, अशा शब्दात चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले.