गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली जगातील सर्वात लांब नाकाची नोंद


तुर्कीमध्ये राहणाऱ्या ७१ वर्षीय मेहमेट ओझुरेकने जगातील सर्वात मोठे नाक असण्याचा विश्वविक्रम केला आहे. सुमारे ३.५ इंच लांब त्याचे नाक आहे. ११ वर्षांपूर्वी सर्वात लांब नाक मिळवण्याचे शीर्षक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्याला दिले होते, परंतु त्याचे नाक वयोमानानुसार सतत वाढत आहे.


जगातील कोणत्याही मानवी नाकातील मेहमेटचे नाक हे सर्वात मोठे आहे. २०१० मध्ये आजच्या दिवशी जीवित लोकांमध्ये सर्वात लांब नाक असण्याची पदवी मेहमेटला अधिकृतपणे देण्यात आली. मेहमेट म्हणतात की त्याच्या नाकाची लांबी अजून वाढत आहे. मेहमेट ही इतिहासातील सर्वात लांब नाक असलेली व्यक्ती नाही. १८ व्या शतकात, थॉमस नावाच्या माणसाचे १९ सेमी लांब नाक होते, पण ते आता हयात नसल्यामुळे सर्वात लांब नाक असण्याचा विक्रम मेहमेटच्या नावी आहे.