एका व्हिडीओद्वारे FSSAI ने सांगितल्या भेसळ युक्त पदार्थ ओळखण्याच्या काही सोप्या ट्रिक्स


आजकाल घरात वापरले जाणारे सगळेच पदार्थ हे सर्रास भेसळयुक्तच असतात. कोणतीही वस्तु पदार्थ हे पुर्णपणे शुद्ध असलेली आढळत नाही. तसेच किती भेसळ कोणत्या पदार्थांमध्ये केलेली आहे हे देखील आपल्या माहीत नसते. तसेच सहजपणे बाजारातील कोणत्याही पदार्थातील भेसळ सापडत नाही, म्हणून भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे लोकांना जागरूक केले आहे.

FSSAI द्वारे काही सोप्या ट्रिक्स व्हिडीओमध्ये सांगितल्या आहेत, तुम्ही ज्याद्वारे कोणत्याही भेसळयुक्त गोष्टी अचूक पद्धतीने ओळखू शकाल. FSSAI ने एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तुम्हाला काळी मिरीची भेसळ ओळखता येईल. यानंतर तुम्ही योग्य भेसळ न केलेली काळीमिरी बाजारातून खरेदी करू शकता.


काळी मिरीच्या दाण्यांमध्ये भेसळ करणारे अनेकदा काही काळ्या बिया टाकतात. FSSAI च्या मते, काळी मिरीची क्वालिटी चेक करण्यासाठी एक छोटी चाचणी पुरेशी असल्याचे सांगितले आहे. याकरिता टेबलावर थोडी काळी मिरी ठेवा. आता त्यांना आपल्या हातांनी दाबण्याचा प्रयत्न करा. जी काळी मिरी पूर्णपणे शुद्ध आहे, ती सहज मोडणार नाही. तर भेसळयुक्त काळी मिरी सहज मोडेल. भेसळ करणारे अनेकदा काळी मिरीमध्ये हलके काळ्या रंगाचे बेरी मिसळून विकतात आणि आपल्या आरोग्याशी खेळतात.

काळी मिरी प्रमाणे देखील लाल मिरची पावडरमध्ये भेसळ केलेली असते. यात विटांचा बारीक चुरा, स्लेक्ड पावडर, साबण किंवा वाळू टाकून भेसळ लालमिरची पावडर बाजारात सहज विकली जाते. ते ओळखण्याचा एक मार्ग FSSAI ने सांगितला होता. यासाठी अर्धा ग्लास पाणी घ्या. त्यात एक चमचा लाल मिरची पावडर टाका. आता चमच्याने ग्लासच्या तळपर्यंत लाल मिरची पावडर ढवळा. यानंतर ही मिरची पावडर हातावर घेऊन चोळा. चोळल्यायानंतर जर तुमच्या हातावर खडबडीत लागत असेल तर यात विटांचा चुरा मिक्स केलेला आहे. तसेच जर हाताला चमकदारपणा जाणवत असेल, तर समजून घ्या की त्यात साबणाची पावडर वापरली गेली आहे.

त्याचबरोबर हळदीच्या गुणवत्तेची चाचणी देखील आपण घेऊ शकता. यासाठी काचेचा ग्लास अर्ध्या पाण्याने भरून घ्या. त्यानंतर त्यात एक चमचा हळद टाका. जर हळद पूर्णपणे ग्लासच्या तळाशी स्थिरावली आणि पाण्याचा रंग हलका पिवळा झाला, तर त्यात कोणतीही भेसळ नाही. पण दुसरीकडे जर हळद पूर्णपणे स्थिरावली नाही आणि पाण्याचा रंगही खूप पिवळा झाला, तर त्या हळदीत भेसळ झाल्याचे समजावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही