अॅक्शनपटात पहिल्यांदाच झळकणार आयुष्मान खुराना; शेअर केला टीझर


आजवर हटके भूमिका साकारत प्रेक्षकांची मने बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाने जिंकली आहेत. आयुष्मानने कधी रोमॅण्टिक तर कधी विनोदी भूमिकांमधून चाहत्यांची पसंती मिळवली आहे. पण आता एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आयुष्मान येणार आहे. नुकतीच आयुष्मानच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली असून. हा चित्रपट रोमॅण्टिक किंवा विनोदी नसून हा पूर्णपणे अ‍ॅक्शनपट असणार आहे.


या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. ‘अ‍ॅक्शन हीरो’ असे या चित्रपटाचे नाव असून आयुष्मान या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आयुष्मानाने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचा टीझर शेअर केला असून या टीझर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, अडचण फक्त एकच आहे की मला भांडण्याचा अभिनय करता येतो…भांडता येत नाही…काही तरी वेगळे करण्यासाठी खूप उत्साही आहे. आयुष्मानच्या टीझरला त्याच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे.

पूर्णपणे अ‍ॅनिमेटेड आयुष्मानाच्या या नव्या चित्रपटाचा टीझर असल्याचे दिसत आहे. या बॅकग्राउंडला फक्त आयुष्मानचा आवाज ऐकू येत आहे. आयुष्मानाचा पहिल्यांदाच अ‍ॅक्शन अंदाज या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. २०२२मध्ये ‘अ‍ॅक्शन हीरो’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. भारतासह इंग्लडमध्ये या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुरुद्ध अय्यर करणार आहेत.