चेन्नईच्या या पठ्ठ्याने २.२ किमीपर्यंत दोन चाकांवर रिक्षा चालवत रचला विक्रम


गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मनोरंजक आणि अविश्वसनीय विक्रम नोंदवून स्थान मिळवलेल्या लोकांच्या कथा देखील थक्क करणाऱ्या असतात. असाच एक रेकॉर्ड आम्ही आज सांगणार आहोत, जो तुम्हाला नक्कीच चकित करेल. अनेकदा आयुष्याच्या काही टप्प्यांवर इतिहास घडवणाऱ्या लोकांचे थ्रोबॅक व्हिडीओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे इन्स्टाग्राम पेज पोस्ट करत असतात. २०१५ चा हा व्हिडीओ असून जो काही तासांपूर्वी पोस्ट केला आहे. यात जगथीश मणी नावाचा एक माणूस २.२ किलोमीटर अंतरासाठी आपली तीन चाकी दोन चाकांवर चालवत असल्याचे दिसत आहे.


एपिक ऑटो-रिक्षा साईड व्हीली. चेन्नई येथील ऑटो रिक्षाचालक जगथीश एम यांनी भारतीय टुक टुक (रिक्षा) बाजूने चालवत विक्रम रचला असल्याचे कॅप्शन लिहिले आहे. मी समाधानी असल्याचे जगतीश मणीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसला सांगितले. हा व्हिडीओ, शेअर केल्यापासून, तीन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि प्रतिक्रिया आल्या आहेत. हे फक्त भारतीयच करू शकतात, एका इन्स्टाग्राम युझर्सने म्हटले आहे. मला एक सवारी करायची आहे, दुसऱ्या युझर्सने म्हटले आहे.