शाहरुख खानच्या पार्टीच्या मुलाखतीचा व्हिडीओ शर्लिन चोप्राने केला शेअर


बॉलीवूडचा बादशाह अर्थात शाहरुख याचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर बॉलिवूड आणि ड्रग्जची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. एनसीबीने आर्यनला अटक केल्यानंतर सात तारखेपर्यंत त्याला कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर शाहरुख खानच्या पाठीशी सुनील शेट्टी, पूजा भट्ट, सुझान खान, सुचित्रा कृष्णमूर्ती आणि बॉलिवूडमधील इतर कलाकार असल्याचे दिसत आहेत. त्याचवेळी सलमान खानसह अनेक मोठ्या कलाकारांनी शाहरूखची भेट घेतली. दरम्यान, काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या शर्लिन चोप्राने एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. तिने ज्यामध्ये शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सच्या एका पार्टीचा उल्लेख केला आहे.

सप्टेंबर २०२० मध्ये ही मुलाखत शर्लिनने दिली होती. आयपीएलमध्ये केकेआरच्या विजयानंतर, एक पार्टी आयोजित करण्यात आली होती, जिथे शर्लिन देखील उपस्थित होती. कोणाचे नाव शर्लिनने घेतले नाही, पण शाहरुख खानच्या मालकीच्या केकेआरचा उल्लेख केला आहे. मी कोलकात्याला गेले, सामना पाहिला. त्या रात्री केकेआरचा संघ जिंकला. विजयानंतर पार्टी ठेवण्यात आली होती. केकेआरचे खेळाडू, त्यांची गर्लफ्रेंड, शाहरुख खान, शाहरुखचे जवळचे मित्र, त्यांच्या पत्नी सर्व त्यारात्री पार्टी करत होते. हळूहळू मी पाहिले की धूर केला जात होता. तसेच इतर काही पदार्थांचे सेवन केले जात असल्याचे शर्लिनने म्हटले आहे.


मी नाचून कंटाळले आणि वॉशरूममध्ये गेलो. मी जेव्हा वॉशरूमचा दरवाजा उघडला आणि, तेव्हा मी जे पाहिले ते माझ्यासाठी खूप धक्कादायक होते. मी विचार करत होते की मी चुकीच्या ठिकाणी पोहोचले आहे का, मग मी विचार केला की आपण बरोबर ठिकाणी आलो आहोत. मग हे लोक येथे काय करत आहेत? मी अनेक सेलिब्रेटिंच्या पत्नींना तिथे आरशासमोर उभे राहून पांढरी पावडर ज्याला आपण कोकेन म्हणतो ते घेताना पाहिले, असे शर्लिन म्हणाली.

हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होते. जर अचानक असे दृश्य तुम्हाला दिसले, तर तुम्हाला थोडा धक्का बसतो. माझी नेमकी तीच प्रतिक्रिया होती. मी कसे तरी तिथून बाहेर पडले, कारण मला त्यात सहभागी व्हायचे नव्हते. बाहेर आल्यानंतर मी पाहिले की प्रत्येकजण आपापल्या प्रकारे पार्टीचा आनंद घेत होता. तिथे एक वेगळेच वातावरण होते. मग मी शाहरुख खान आणि त्याच्या मित्रांना भेटायला गेल्याचे शर्लिन म्हणाली.

मला मग समजले की बॉलिवूडमध्ये कोणत्या प्रकारच्या पार्ट्या होतात. आनंदासाठी कोणते पदार्थ वापरले जातात? सहसा, जेव्हाही मोठा कलाकार पार्टी आयोजित करतो, तो निश्चितपणे ड्र्ग्ज देतो. कारण येथे असे मानले जाते की जोपर्यंत तुम्ही ड्रग्जचे सेवन करत नाही, तोपर्यंत उत्साह वाढत नाही आणि पार्टीसाठी ते आवश्यक असल्याचे शर्लिनने म्हटले आहे.