ड्रग्स प्रकरणात फसले होते हे बॉलीवूड सेलेब्रिटी

मुंबई गोवा क्रुझवर अमली पदार्थ विरोधी पथकाने घातलेल्या छाप्यात शाहरुख पुत्र आर्यन याला अटक झाल्यानंतर ड्रग्स आणि बॉलीवूड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अमली पदार्थ जवळ बाळगणे किंवा विक्री करण्यासंदर्भात आजपर्यंत अनेक बॉलीवूड, टीव्ही कलाकाराना पोलिसांनी अटक केली आहे. ही यादी बरीच मोठी असून त्याची सुरवात मुन्नाभाई संजय दत्त याच्यापासून झाली होती.

१९८२ मध्ये संजय दत्त याला अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि त्याला पाच महिने तुरुंगात राहावे लागले होते. त्यानंतर पिता सुनील दत्त यांनी त्याला युएस मधील रिहॅब सेंटर मध्ये पाच महिने ठेवले होते. फिरोज खान यांचा मुलगा आणि फरदीन खान यालाही कोकेन सेवन प्रकरणात अटक झाली होती. २००५ मध्ये दिवाने हुये पागल चित्रपट शुटींग दुबईत झाले तेव्हा तेथून परतल्यावर विजय राज याला विमानतळावर गांजा आणल्याबद्दल पकडले गेले होते. रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक याला सुशांतला ड्रग पुरविल्याच्या आरोपावरून अटक झाली होती. रणबीर कपूर यालाही अमली पदार्थ सेवन प्रकरणात पकडले गेले होते. बिग बॉस फेमस अरमान कोहली याच्या घरात कोकेन सापडले होते आणि त्याला अटक करून तुरुंगात पाठविले गेले आहे तसेच एजाज खान, टीव्ही कलाकार गौरव दीक्षित, अर्जुन रामपाल यांचीही नावे अश्या केसेस मध्ये आली आहेत.

यात अभिनेत्री सुद्धा मागे नाहीत. सुशांत प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला अमली पदार्थ प्रकरणात एक महिना तुरुंगवास भोगावा लागला असून अजून तिची केस सुरु आहे. सारा अली खान, दीपिका पदुकोण, कॉमेडीयन भारती सिंग, टीव्ही कलाकार प्रीतिका चौहान, फिरोज नाडियादवाला याची पत्नी शबाना, रकुलप्रीत, श्रद्धा कपूर याचीही नावे अश्या प्रकरणात आली आहेत.