रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणतीही औषधे घेण्यापेक्षा योगासन करणे फायदेशीर आहे. योगासन दररोज केल्यास प्रतिकारशक्ती वाढते. जाणुन घेऊयात काही योगासने
रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी करा ‘ही’ योगासने
सुप्त वज्रासन योग
वज्रासनात बसताना लक्षात ठेवा की, गुडघे आणि बोटे एकमेकाला चिकटलेली असावी. हळूहळू हाताला मागे घेऊन जमिनीला टेकवा. मान वर उचला आणि दीर्घ श्वास घ्या. यामुळे छातीला फुगवून शरीरात ऑक्सिजन वाढवते. बद्धकोष्ठता दूर करते. मेरुदंडाला फायदा होतो.
उष्ट्रासन योग
गुडघ्यावर उभे राहा. आता मागच्या बाजूला वाकून हाताने टाचांना पकडण्याचा प्रयत्न करा. डोके आणि पाठीच्या कण्याला जास्तीत जास्त मागे वाकवा. १०-१५ मिनिटे याच स्थितीत राहा. या योगासनामुळे दम्याच्या रुग्णांसाठी हे उत्तम आसन आहे. मधुमेहाला ठीक करते. फुफ्फुस मजबूत होते.
पर्वतासन योग
उजव्या पायाला सरळ करून डाव्या पायाजवळ ठेवा. शरीराला हातावर संतुलित करा. आता कंबरेच्या भागाला जास्तीत जास्त वरच्या बाजूला उचला. डोके दोन्ही हातांमध्ये आणा. हातांना सरळ ठेवा आणि टाचा जमिनीला टेकवा. कंबरेला वर उचलत हळूहळू श्वास सोडा. या योगासनामुळे रक्तप्रवाहामध्ये वाढ होते. दृष्टी चांगली होते. शरीराची लवचिकता वाढते.