जगातील क्रूर तानाशाहांच्या ‘या’ धर्मपत्नी

Dictatorial-symbols
या जगाच्या इतिहासामध्ये अनेक तानाशाह होऊन गेले आहेत. यांच्या राजवटीमध्ये यांच्या रयतेने अपार कष्ट भोगले आहेत. आपल्या मनमर्जीनुसार कारभार चालविणाऱ्या या तानाशाहांनी कधीच कोणाची गय केली नाही. त्यांच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस ज्यांनी केले त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी या तानाशाहांनी कोणतीही कसर सोडली नाही. या क्रूर शासनकर्त्यांच्या राजवटीमध्ये जनतेची परिस्थिती अशी असताना, या शासनकर्त्यांशी जन्मभर साथ देण्याच्या शपथेने बांधल्या गेलेल्या त्याच्या धर्मपत्नी कोण होत्या, त्यांचे आयुष्य कसे होते हे जाणून घेणे रोचक ठरेल.
Worst-Men2
आजवरच्या जागतिक इतिहासातील, जगातील सर्वात क्रूर तानाशाह म्हणून अडॉल्फ हिटलर ओळखला जातो. त्याची पत्नी एव्हा ब्राऊन हिचा जन्म म्युनिचमध्ये १९१२ साली झाला. हिटलर आणि एव्हाची जेव्हा प्रथम भेट झाली, तेव्हा एव्हा केवळ सतरा वर्षांची होती. त्याकाळी एव्हा, हिटलरच्या एका छायाचित्रकारासाठी मॉडेलिंग करीत असे. पण हिटलर आणि एव्हाचे प्रेमसंबंध जगजाहीर झाले, ते दुसऱ्या महायुद्धानंतर. १९३८ साली हिटलरच्या सोबतीने जेव्हा विंटर ऑलिम्पिक्स साठी एव्हाने हजेरी लावली, तेव्हा त्यांचे प्रेमसंबंध जगजाहीर झाले. एव्हा आणि हिटलरच्या विवाहासंबंधी सर्वात विशेष गोष्ट अशी, की एव्हा केवळ चाळीस तासांसाठी हिटलरची पत्नी होती. आत्महत्या करण्यापूर्वी चाळीस तास आधी हिटलरने एव्हाशी विवाह केला होता. हिटलरने स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली, तर एव्हाने सायनाइड प्राशन करून प्राण त्यागले.

Worst-Men3
लिबिया देशाचे पंतप्रधान असलेले मुआम्मार गद्दाफी यांची पत्नी साफिया फारकाश मूळच्या कुठल्या यावर मतभेद आहेत. काहीच्या म्हणण्यानुसार साफियाचा जन्म लिबियामधीलच असून, तिथे त्या परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. पण काहींच्या म्हणण्यानुसार साफियाचा जन्म बोस्निया व हर्जेगोविना येथील आहे. साफिया मूळच्या कुठल्या यावर जरी मतभेद असले, तरी १९७० साली गद्दाफी यांना काही कारणाने रुग्णालयामध्ये दाखल केले गेल असता, तिथे गद्दाफी आणि साफियाची भेट झाली हे मात्र खरे आहे. त्यानंतर या दोघांनी विवाह केला. या दाम्पत्याला सात अपत्ये असून, आणखी दोन अपत्ये त्यांनी दत्तक घेतली होती. गद्दाफी यांच्या मृत्युनंतर सध्या साफिया अल्जिरीयामध्ये निर्वासित म्हणून आयुष्य कंठीत आहे.
Worst-Men7
साजिदा तल्फा ही इराकचे एके काळी पुढारी असलेल्या सद्दाम हुसेनच्या तीन पत्नींपैकी एक असून, तिचा जन्म १९४० साली इराकमध्ये झाला. १९५८ आली सद्दाम आणि साजिदा विवाहबद्ध झाले. त्यानंतर त्यांना पाच अपत्येही झाली. साजिदाशी विवाह झाल्यानंतर सद्द्दामने आणखी एक विवाह केला. या विवाहामुळे साजिदा नाखूष होती. सद्दाम आणि साजिदा यांचे परस्स्परांशी संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले असल्याने सद्दामने साजिदा कधीही आपली पत्नी म्हणून समाजापुढे येऊच दिले नाही. साजिदापेक्षा सद्दामची दुसरी पत्नी इराकच्या जनतेला अधिक परिचयाची होती. २००३ साली बगदादवर बॉम्बहल्ले होण्याआधीच साजिदा कतार येथे स्थानांतरीत झाल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment