मेस्सीच्या घरात चोरट्यांनी केली हातसफाई

जगातील श्रीमंत फुटबॉलपटू पैकी एक लियोनेल मेस्सी सध्या ज्या पंचतारांकित हॉटेल मध्ये त्याच्या परिवारासह मुक्काम टाकून आहे तेथे चोरट्यांनी हात मारला असल्याचे वृत्त आहे. या चोरीत मौल्यवान दागिने आणि रोकड रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. चोरीस गेलेल्या मालाची किंमत साधारण ४० लाख रुपये असल्याचे समजते.

मेस्सीने काही दिवसांपूर्वी बर्सिलोना क्लबला रामराम ठोकून पीएसजी क्लबबरोबर करार केला आहे. त्यामुळे तो सध्या त्याची पत्नी आणि तीन मुलांसह पॅरीस मधील पंचतारांकित हॉटेल मध्ये चार रूमच्या स्यूट मध्ये राहतो आहे. या स्यूटचे एका रात्रीचे भाडे २३ हजार डॉलर्स म्हणजे १७ लाख रुपये आहे. द सनच्या रिपोर्ट नुसार मेस्सी पीएसजी चँपियनशिप लीगचा सामना खेळून त्याच्या या तात्पुरत्या घरी आला तेव्हा त्याला रूम मध्ये चोरी झाल्याचे कळले. चोरट्यांनी रूमच्या छतावरून खोलीत प्रवेश केला आहे. स्थानिक पोलीस तपास करत आहेत.

चोरट्यांनी सुमारे २९ लाख रुपये किंमतीचे दागिने आणि १५ हजार डॉलर्स रोख असा ऐवज लंपास केला आहे. मेस्सी पत्नी एँटोनोम रोकुज्जो आणि तीन मुलांसह या हॉटेल मध्ये राहत असून ऑगस्ट मध्येच या सर्वांची सुरक्षा व्यवस्था वाढविली गेली असल्याचे समजते.