व्हिडीओ व्हायरल; शक्ती मोहनला नीरज चोप्राने केले प्रपोज


गेल्या काही दिवसांपासून भारताला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून देणाऱ्या नीरज चोप्रा चांगलाच चर्चेत आहे. नीरज अगदी कमी काळातच नॅशनल क्रश बनला आहे. यातच नीरजने आता एका सेलिब्रिटीला प्रपोज केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे नीरजच्या चाहत्या असलेल्या अनेक तरुणींचा कदाचित हिरमोड होवू शकतो.

नुकताच ‘डान्स प्लस ६’ या शोमध्ये नीरजने हजेरी लावली होती. नीरज लवकरच टेलिकास्ट होणाऱ्या या खास एपिसोडमध्ये कोरिओग्राफर शक्ती मोहनला प्रपोज करताना दिसून येणार आहे. या शोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात शक्ती मोहन नीरजला प्रपोज करण्यास सांगताना दिसत आहे. नीरजे यावर त्याचे पहिले प्रेम भालाफेक असल्याचे म्हंणत हटके अंदाजाच शक्तीला प्रपोज केल्याचे दिसून येत आहे.

तसेच नीरज या व्हिडीओत त्याला स्वयंपाक बनवता येत नसून तो तिला जास्त वेळ देऊ शकत नसल्याचे सांगताना दिसत आहे. तर नीरजने शक्तीला प्रपोज केलेले राघवला आवडले नसल्याचे पाहायला मिळते. भावा तू चुकिच्या ठिकाणी भाला फेकलास, असे राघव नीरजला म्हणाला. या खास भागात प्रेक्षकांना नीरजाचा डान्सिंग अंदाज देखील पाहायला मिळणार आहे. नीरजने लग्नातील डान्स तसेच विविध समारंभामध्ये केल्या जाणाऱ्या डान्सची स्टाइल दाखवली आहे.