24 आणि 31 ऑक्टोबर रोजी होणार आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षा


मुंबई – आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षेच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात आल्या आहेत. 24 ऑक्टोबरला वर्ग क पदासाठी तर 31 ऑक्टोबर रोजी वर्ग ड साठी परीक्षा होणार आहे. 9 दिवस अगोदरच सर्व परीक्षार्थींना प्रवेशपत्र मिळणार आहे. दरम्यान, यापूर्वी परीक्षा आदल्या दिवशी रात्री अचानक स्थगित करण्यात आली होती. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला होता.

आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐन वेळी रद्द झाल्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या लाखो उमेदवारांना मनस्ताप आणि आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यावेळी रद्द झालेली परीक्षा कधी होणार? याबाबतही साशंकता असून आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. दरम्यान काल मुंबईत आरोग्य विभागाची बैठक घेतली जाईल, या बैठकीत परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या जातील, असे राजेश टोपे यांनी सांगितले होते. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार या परीक्षा आता वर्ग क पदासाठी 24 ऑक्टोबर तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे.