मोहम्मद शमी नव्या भूमिकेत, चाहत्यांना खिलवणार टेस्टी बिर्याणी?

आयपीएल २०२१ मध्ये पंजाब किंग्स कडून खेळत असलेला आणि टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी क्रिकेट खेळतानाच आणखी एक नवा व्यवसाय सुरु करत आहे. खुद्द शमीने त्याच्या या नव्या व्यवसायासंदर्भात एक अॅनिमेटेड फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. शमी बिर्याणीचा अतोनात भोक्ता आहे आणि आता आपल्या चाहत्यांना सुद्धा तो स्वतः शेफ बनून बिर्याणी खिलवणार आहे. शमी बिर्याणी सेंटर नावाने हा नवा उद्योग तो करणार आहे.

शमीने शेअर केलेल्या फोटोत तो स्वतः शेफच्या ड्रेस मध्ये हातात एक प्लेट घेऊन उभा दिसतो आहे. या प्लेट मध्ये सात पांढऱ्या रंगाचे क्रिकेट बॉल आहेत. मागच्या दोन बोर्ड पैकी एकावर शमी बिर्याणी सेंटर अशी अक्षरे दिसत आहेत तर दुसऱ्या बोर्डवर कोणकोणत्या प्रकारच्या बिर्याणी मिळतील त्याची नावे दिसत आहेत. ही नावे शमीच्या बॉल्स वरून ठेवली गेली आहेत. डॉट बॉल, इनस्विंगर, स्पीड बाउन्सर अशी ही नावे आहेत.

शमीने ज्या प्रकारे ही पोस्ट केली आहे त्यावरून ती केवळ मजा म्हणून केली असावी असे सांगितले जात आहे. रेस्टॉरंट व्यवसायाचा त्याचा कोणताही हेतू नसावा असे मानले जात आहे.