९० ते २०००च्या दशकातील अतिशय लोकप्रिय पॉर्नस्टारचा अनोख विक्रम


पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींना नेहमी वेगळे मानले जाते. पण एक काम म्हणून हे या अभिनेत्री करत असतात आणि या सर्वाचा त्यांच्या खासगी आयुष्यावर परिणाम होणार नाही याचा प्रयत्न करत असतात. दरम्यान पॉर्नस्टार जॅसमीन सेंट क्लेअरने आता पॉर्न इंडस्ट्री सोडली असून ती सध्या रेस्लिंगमध्ये काम करताना दिसत आहे. पण एका मुलाखतीदरम्यान तिने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना एक विचित्र विक्रम केल्याचा खुलासा केला आहे.


९० ते २०००च्या दशकातील जॅसमीन सेंट क्लेअर ही अतिशय लोकप्रिय पॉर्नस्टार होती. तिने अनेक पॉर्न चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या नावावर एक विचित्र विक्रम आहे. जॅसमीनने एका दिवसात ३०० पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवत विक्रम केला होता. एका अ‍ॅडल्ट चित्रपट निर्मात्याशी काही दिवसांपूर्वी संवाद साधताना जॅसमीनने हा विचित्र विक्रम केल्याचे सांगितले. तसेच हा तिच्या एक कामाचा भाग होता आणि त्याची मला लाज वाटत नसल्याचे जॅसमीन म्हणाली. तो दिवस तिच्यासाठी व्यस्त दिवस होता आणि जवळपास १० तास काम केल्यानंतर घरी गेल्याचे तिने सांगितले होते.

पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर जॅसमीन रेस्लिंग करताना दिसताना दिसत आहे. तिने त्यासाठी क्लासेल लावले होते. एक्स्ट्रीम चॅम्पियनशीपमध्ये ती दिसली होती. या विषयी बोलताना ती म्हणाली, हे प्रोफेशन थोडे खतरनाक आहे. पण लहानपणापासूनच मला आवड असल्यामुळे तिने रेस्लिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला. तिने ‘बॅड अ‍ॅपल्स’ आणि ‘डॉर्म डेज २’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.