छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय असा ‘बिग बॉस’ शो आहे. त्यात हिंदीसोबतच ‘बिग बॉस मराठी’चे ही लाखो चाहते आहेत. नुकतेच ‘बिग बॉस मराठी’चे हे ३ पर्व सुरु झाले आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होताच या शोने प्रेक्षकाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी स्पर्धक म्हणून किर्तनकार शिवलीला पाटील यांनी हजेरी लावली आहे. शिवलीला यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या ३ पर्वात एण्ट्री केल्यापासून त्या सतत चर्चेत आहेत.
‘बिग बॉस’मध्ये सहभाग घेतल्यामुळे ट्रोल झाल्या किर्तनकार शिवलीला पाटील
घरात टिकूण राहण्यासाठी ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात असलेल्या प्रत्येक स्पर्धकाला टास्क करावे लागतात. प्रत्येक स्पर्धकाप्रमाणे शिवलीला यांना देखील टास्क करावा लागला. नेहमीच स्टेजवर उभ राहून किर्तन करणाऱ्या शिवलीला यांना टास्क करताना पाहून नेटकऱ्यांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणतो, चुकीचा निर्णय घेतला ताई…बिग बॉस हा फालतू अड्डा आहे. दुसरा नेटकरी म्हणतो, लोका सांगे ब्रह्म ज्ञान……… स्वतः मात्र कोरडे पाषाण. तर तिसरा नेटकरी म्हणतो, ज्ञानेश्वरीला परवानगी दिली नाही, तेव्हाच नकार द्यायला हवा होता..वारकरी संप्रदायाच्या लोकांसाठी ही जागा नाही…हे स्पष्टपणे दर्शवते की आपण प्रसिद्धी निवडतो. आणखी एक नेटकरी म्हणाला, हे चुकीचे आहे ताई, तुम्ही लोकांना ज्ञान शिकवता आणि तुम्ही जात आहात म्हणजे अवघड आहे. आणखी एक नेटकरी म्हणतो, लोकांना ब्रम्हज्ञान सांगत होती पण स्वतः मात्र कोरडी पाषाण निघाली वयस्कर बायकांना मालिका बघता म्हणून नाव ठेवत होती आणि स्वतः फालतू शो मध्ये जाते. तसेच कलियुगातील किर्तनकार घ्या आता, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी शिवलीला यांना ट्रोल केले आहे. व्हायरल झालेल्या या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी शिवलीला यांना ट्रोल केले आहे.
शिवलीला पाटील यांचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे गाव आहे. ज्यांची कीर्तने सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत, अशा तरुण कीर्तनकारांमध्ये ह.भ.प. शिवलीला बाळासाहेब पाटील यांचे नाव घेतले जाते. शिवलीला यांच्या कीर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. संत साहित्य, संस्कृती आणि सद्य विषयांवर शिवलीला कीर्तन करतात.