अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या पाचव्या सुधारित किंमतीस प्रशासकीय मान्यता


मुंबई – रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील मौजे करक येथील अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या १००८ कोटी ९६ लाख रुपये किंमतीच्या पाचव्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

अर्जुना नदीवर उभारण्यात आलेले हे धरण मातीचे असून ते कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे अंतर्गत “कोकण प्रदेश” या प्रदेशांतर्गत आहे. या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामधील 12 गावांतील 4733 व लांजा तालुक्यामधील 6 गावांतील 1438 हे. क्षेत्र असे मिळून 18 गावातील 6171 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

अर्जुना मध्यम प्रकल्प हा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतंर्गत(PMKSY)समाविष्ट असून नियोजनानुसार प्रकल्पाची कामे मार्च-2022 अखेर पूर्ण करावयाचे आहे.