शिल्पा शेट्टी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’चा प्रोमो शेअर केल्यामुळे झाली ट्रोल


मागील काही महिन्यांपासून बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा चांगलीच चर्चेत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात तिचा पती राज कुंद्राला अटक झाली होती. नुकतीच राज कुंद्राची जामीनावर सुटका झाली आहे. पण शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा या प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आले होते. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पाने ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या शोचे शूटिंगदेखील काही दिवस बंद केले होते. ती या शोच्या शूटिंगसाठी जवळपास एक महिन्यांनी पुन्हा परतली होती.

यानंतर शिल्पा आता ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत झळकणार आहे. या शोचा एक प्रोमो शिल्पाने नुकताच शेअर केला. पण यामुळे ती चांगलीच ट्रोल झाली आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर निशाणा साधला आहे.


काही नेटकऱ्यांनी शिल्पा शेट्टीच्या व्हिडीओवर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी शिल्पाला चांगलेच ट्रोल केले आहे. एक युजर म्हणतो, राज कुंद्राकडे एक से बढकर एक असे खूप टॅलेंट आहे. मॅम त्यांनाही बोलवा टीव्हीवर आम्हालादेखील पाहू द्या, तर दुसरा युजर म्हणतो, तुमच्या पतीचे टॅलेंट दाखवा. आणखी एक युजर म्हणतो, कुंद्रादेखील आपले टॅलेंट दाखवू शकतो.

एक युजर तिच्या एका वक्तव्यावर निशाणा साधत म्हणाला, बेस्ट टॅलेंट-पत्नीला पती काय करतो हेच ठाऊक नाही किंवा जाणून घेण्याची इच्छा नाही. अनेक नेटकऱ्यांनी राज कुंद्रावरून शिल्पावर निशाणा साधला आहे.