नेहा कक्करचा गर्भवती असल्याच्या चर्चांवर खुलासा


काही दिवसांपूर्वीच आपल्या सुरेल आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिका नेहा कक्करचे लग्न झाले. २४ ऑक्टोबर २०२० रोजी नेहाने रायझिंग स्टार फेम गायक रोहनप्रीत सिंगसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर सोशल मीडियावर नेहा कक्कर प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सतत रंगल्या होत्या. आता नेहाने एका कार्यक्रमात याबाबत वक्तव्य करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

काही दिवसांपूर्वी नेहाचे कांटा लगा हे गाणे रिलीज झाले. नेहाने या गाण्याच्या प्रमोशनसाठी ‘डान्स दीवाने ३’ या शोमध्ये हजेरी लावली. तिच्यासोबत या शोमध्ये तिचा भाऊ टोनी कक्कर आणि रॅपर यो यो हनी सिंग देखील उपस्थित होते. दरम्यान एका स्पर्धकाचा डान्स पाहून नेहा इम्प्रेस झाली आणि म्हणाली, मला असेच मुल हवे आहे.

दरम्यान, बाळासाठी नेहा आणि रोहनप्रीतने प्लॅनिंग केलेले नसल्याचे म्हणत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘डान्स दीवाने ३’ या कार्यक्रमात नेहाला स्पर्धक गुंजनचा डान्स प्रचंड आवडला होता. ती तिची प्रशंसा करत म्हणाली, आयुष्यात तुला हवे ते मिळू दे. नेहा पुढे म्हणाली की, अजून मी आणि रोहनने बाळाचे प्लॅनिंग केले नाही. पण जेव्हा कधी करु, तेव्हा आमचे बाळ गुंजन सारखे होऊ दे, अशी मी देवाकडे प्रार्थना करेन.