भारतात दाखल झाले गुगलचे नवीन About this result फीचर


यावर्षी फेब्रुवारीमध्ये सर्च रिजल्टसाठी एक नवीन फीचर Google ने सादर केले होते. युजर्सना सर्च रिजल्टमधील वेबसाईटची माहिती About this result नावाचे हे फिचर देतो. हे फिचर सुरवातीला फक्त अमेरिकेपुरते मर्यादित होते. आता हे फिचर भारतीय युजर्ससाठी देखील उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

गुगल सर्च पेजवर सर्च रिजल्टमध्ये आलेल्या वेबसाईटची लोकांना गुगलच्या या नवीन फीचरमुळे जास्त माहिती मिळते. त्यामुळे लोकांना अतिरिक्त माहिती मिळेल आणि त्यांना वेबसाईट विषयी जाणून घेता येईल आणि विश्वास ठेवता येईल. हे फिचर आरोग्य आणि आर्थिक व्यवहारांविषयी माहिती शोधणाऱ्या गुगलर्ससाठी जास्त उपयुक्त ठरू शकते. ही अतिरिक्त माहिती कोणताही दुसरा सर्च न करता देण्यात येईल, असे गुगलने सांगितले आहे.

डेस्कटॉप, मोबाईल वेब आणि अँड्रॉइड डिवाइसेसवर गुगलचे हे About this Result हे नवीन फिचर उपलब्ध होईल. या फीचरचा वापर करण्यासाठी गुगलवर एखादे सर्च केल्यावर रिजल्ट कार्डवर उजवीकडे सर्वात वरच्या बाजूला असलेल्या 3 डॉट्सवर क्लिक करावे लागेल. यावर क्लिक करताच गुगल Wikipedia वरून तुम्हाला वेबसाईटची थोडक्यात माहिती देईल. जर त्या वेबसाईटचे Wikipedia डिस्क्रिप्शन असेल, तर गुगल तुम्हाला इतर अतिरिक्त माहिती देईल. याव्यतिरिक्त HTTPS प्रोटोकॉलच्या आधारावर साईटचे कनेक्शन सुरक्षित आहे कि नाही हे देखील गुगल सांगेल. या फीचरमुळे युजर्संना कोणत्या वेबसाईटवर विश्वास ठेवायचा हे ठरवण्यास मदत होईल.