डेंग्यूपासून मधुमेहापर्यंत अनेक विकारांवर उपयुक्त ‘गिलोय’


टीनोस्पोरा कॉर्डिफोलिया, म्हणजेच गिलोय, हे एक बहुगुणकारी वनस्पती आहे. अनेक विकारांच्या उपचारांसाठी गिलोय वापरता येते. अनेक पौष्टिक तत्वांनी उपयुक्त गिलोयचा वापर निरनिराळ्या आयुर्वेदिक आणि हर्बल औषधांमध्ये करण्यात येतो. गिलोयचे खोड अनेक गुणकारी तत्वांनी आणि अल्कलॉईड्सने युक्त असल्याने याचा वापर प्रामुख्याने करण्यात येतो. गिलोयमध्ये स्टेरॉईड्स, फ्लॅवनॉईड्स, लिग्नंट्स, कर्बोदके, इत्यादी तत्वेही आढळतात. आयुर्वेदाच्या अनुसार गिलोयचा वापर काढ्याच्या स्वरूपात, चूर्णाच्या किंवा रसाच्या स्वरूपात करता येतो. गिलोय रक्तशुद्धी करणारी, ब्लड शुगर लेव्हल्स नियंत्रित करणारी, संधिवात रोखणारी आहे. याच्या सेवनाने स्मरणशक्तीही तल्लख होत असल्याचे म्हटले जाते. तसेच डेंग्यू सारख्या आजारामध्ये रुग्णाच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ नये, यासाठी गिलोय ही प्रभावी औषधी आहे.

गिलोयचा वापर करण्यासाठी दररोज दोन ते तीन ग्राम गिलोय चूर्ण दिवसातून दोन वेळा सेवन करावे. अथवा पाच ते दहा मिलीलीटर, म्हणजेच एक ते दोन चमचे गिलोयचा रस सेवन करावा. गिलोयचा काढा तयार करायचा असल्यास एक कप गरम पाण्यामध्ये एक इंच लांबीचे गिलोय, पाणी अर्धे राही पर्यंत उकळावे. हा काढा थोडा थंड झाला की त्याचे सेवन करावे. डेंग्यू झाला असता एक फुट लांबीचे गिलोय घेऊन हे बारीक वाटावे आणि त्याचा रस काढून घ्यावा. या रसामध्ये तुळशीची पाने घालून त्यामध्ये थोडे पाणी घालून उकळून घ्यावे आणि हा काढा रुग्णास पिण्यास द्यावा. त्यामुळे शरीरातील प्लेटलेट्समध्ये घट होत नाही, आणि अंगदुखी कमी होण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment