उत्तम आरोग्यासाठी काळे मिरे उपयुक्त


भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये काळे मिरे केवळ मसाल्याच्या पदार्थांमध्येच नाही, तर औषधी म्हणूनही वापरण्याची पद्धत फार प्राचीन काळापासून रूढ आहे. अनेक विकारांच्या उपचारांसाठी काळे मिरे उत्तम औषधी म्हणून वापरले जातात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी देखील काळे मिरे अतिशय उपयुक्त आहेत. ज्यांना सतत शारीरिक थकवा जाणवत असेल त्यांनी दररोज गरम पाण्यासोबत काळ्या मिऱ्यांचे सेवन करावे. याने शरीरातील थकवा, अशक्तपणा दूर होण्यास मदत होऊन शरीरातील पाण्याची पातळी देखील त्यामुळे नियंत्रित राहते. तसेच ज्यांना वारंवार पित्ताचा त्रास होतो, त्यांच्यासाठी देखील हा उपाय लाभदायक आहे.

ज्यांना बद्धकोष्ठाचा त्रास आहे, त्यांनी एक कप गरम पाण्यामध्ये थोडेसे मीठ, लिंबाचा रस आणि काळ्या मिऱ्यांची पूड घालून हे मिश्रण नियमित सेवन करावे. या मिश्रणाच्या सेवनाने बद्धकोष्ठाचा त्रास काहीच दिवसांमध्ये दूर होईल. तसेच ज्यांना वारंवार गॅसेसचा त्रास होतो त्यांनीही या मिश्रणाचे सेवन नियमित करावे. गरम पाण्यासोबत काळे मिरे सेवन केल्याने शरीरातील मेदाचे प्रमाण कमी होते. शरीरातील अतिरिक्त कॅलरीज या मिश्रणाच्या सेवनाने खर्च केल्या जातात.

सर्दी-पडसे झाले असताना दुधामध्ये काळे मिरे उकळून हे दुध पिण्यास दिल्याने सर्दी लवकर बरी होण्यास मदत होते. अनेकांना हिवाळ्याच्या दिवसांत किंवा पावसाळ्यामध्ये दही खाल्ल्याने सर्दी होते. अश्या वेळी घरी दही विराजताना गरम केलेल्या दुधामध्ये काही काळे मिरे घालून मग नेहमी प्रमाणेच दही विरजावे. काळे मिरे घालून विरजलेले दही बाधत नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment