तिशीपर्यंत असे मिळावा आर्थिक स्थैर्य


आजकालच्या काळामध्ये आपल्या गरजांप्रमाणे आर्थिक नियोजन करतानाच अडचणीच्या काळासाठी बचत करणेही आवश्यक झाले आहे. योग्य रीतीने आर्थिक नियोजन केल्यास आयुष्यामध्ये आर्थिक स्थैर्य लवकर मिळविता येते. यासाठी सर्वप्रथम आर्थिक उत्पन्न आपल्या नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून मिळवतानाच आर्थिक मिळकतीच्या इतर पर्यायांचा विचारही करायला हवा. ही आर्थिक मिळकत रियल इस्टेट, किंवा शेअर्स, व म्युचुअल फंड्समध्ये पैसे गुंतविल्याने होऊ शकते. नोकरीव्यतिरिक्त एखाद्या लहानश्या साईड बिझनेसमुळे ही आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊ शकते. थोडक्यात सांगायचे झाले, तर आर्थिक मिळकतीचे जितके पर्याय अवलंबता येतील तितके अवलंबले गेल्याने आर्थिक स्थैर्य मिळविता येणे शक्य होते.

आपल्या मिळकतीची गुतंवणूक करताना निरनिराळ्या योजनांमध्ये पैसे गुंतविता येऊ शकतात. यामध्ये अनेक योजना अश्या असतात, ज्यांच्यामध्ये पैश्यांची गुंतवणूक केल्यानंतर करातून सवलत मिळू शकते. या योजना कोणत्या आहेत ते पाहून आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने या योजनांमध्ये पैसे गुंतवावेत. पैशांची योग्य प्रकारे केलेली गुंतवणूक एका अर्थी पैश्यांची बचतच असते. आजकाल थोडेसे पैसे हातात आले, की त्या पैश्यांचा उपयोग किंमती, चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी होताना ही आपण अनेकदा पहात असतो. मात्र आपले आर्थिक उत्पन्न स्थिर असल्याशिवाय आवश्यकता नसताना या वस्तूंमागे अनावश्यक खर्च टाळला जावा.

आताच्या इंटरनेटच्या युगामध्ये पैश्यांची गुंतवणूक, योग्य आर्थिक मोबदला मिळेल अश्या दृष्टीने कश्या प्रकारे केली जावी याचे मार्गदर्शन ऑनलाईन व्हिडियोज किंवा पॉडकास्ट्सच्या माध्यमातून उपलब्ध असते. आपल्या मोकळ्या वेळामध्ये या व्हिडियोज किंवा पॉडकास्टच्या आधारे कोणत्या प्रकारची गुंतवणूक करणे शक्य आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. जर आपला व्यवसाय असेल, तर व्यवसायामध्ये बरकत होऊन आर्थिक वृद्धीसाठी मुळात आपल्या मतांशी मते जुळणारी किंवा आपल्या पातळीवर राहून विचार करणाऱ्या तज्ञ मंडळींचा सल्ला आपल्या उपयोग पडू शकतो. तसेच व्यवसायामध्ये आपल्यापेक्षा अधिक यशस्वी उद्योजकांच्या कामाच्या पद्धतीचा अभ्यास आणि त्यांच्याकडून मिळालेले मार्गदर्शनही आर्थिक प्रगती आणि स्थैर्याच्या दृष्टीनेही सहायक ठरू शकते.

Leave a Comment