मुंबई इंडियन्सने शेअर केले आपले नवे Anthem


इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचे उर्वरित सामने रविवारपासून खेळवण्यात येणार असल्यामुळे त्यामुळे आयपीएलचे चाहते उत्साहात आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात युएई येथे पहिल्या सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे.


मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडीओत जसप्रीत बुमराह, ईशान किशन ते हार्दिक पांड्या असे संघाचे स्टार खेळाडू थिरकताना दिसत आहे. निता अंबानी यांनी या व्हिडीओत मराठीत महाराष्ट्रातील प्रत्येक फॅमिलीचा अभिमान आहे मुंबई इंडियन्स, असे म्हटले आहे.