पल्स ऑक्सिमीटर विषयी खास माहिती

करोना काळात अनेक नवी उपकरणे वापरात आली तशीच अनेक पूर्वीपासून वापरात असलेली काही उपकरणे सुद्धा महत्वाची ठरली. त्यातील एक उपकरण म्हणजे पल्स ऑक्सिमीटर. या उपकरणाचा वापर पूर्वीपासून रुग्णालयात होत आहे पण करोना काळात हे उपकरण थर्मामीटर प्रमाणे घरोघरी वापरले जाऊ लागले आहे.

या उपकरणाचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे तो ऑक्सिमीटर. याच्या सहाय्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी समजते. दुसरा आहे तो पल्स ऑक्सिमीटर. यात रक्तातील ऑक्सिजन पातळी आणि हार्ट रेट किंवा पल्स रेट एकाच वेळी समजू शकतो. हे छोटेसे उपकरण हाताच्या बोटाच्या पेरावर स्टेपल केल्याप्रमाणे लावले जाते. या उपकरणामुळे संबंधित करोनाबाधित आहे का हे समजत नाही पण ऑक्सिजन पातळी जर नेहमीच्या तुलनेत कमी झाली असेल तर डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवा असे म्हणता येते.

पल्स ऑक्सिमीटर मध्ये मॉनीटर, बॅटरी आणि डिस्प्ले असतो. काही ऑक्सिमीटर पायाच्या बोटाला किंवा कानाच्या पाळीला लावून सुद्धा रक्तातील ऑक्सिजन पातळी मोजली जाते. १० सेकंदात ही चाचणी होते. ऑक्सिमीटरची खरेदी करताना थोडी काळजी घ्यावी. अगदी ५०० रुपयापासून ते २ हजार पर्यंत त्यांच्या किमती आहेत. पण स्वस्त उपकरण चुकीचे रीडिंग देण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो ब्रांडेड ऑक्सिमीटर घ्यावा असा सल्ला दिला जातो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही