येत्या 17 सप्टेंबरपासून Zomato बंद करणार आपली ग्रॉसरी सेवा


नवी दिल्ली – आपली ग्रॉसरी सेवा येत्या 17 सप्टेंबरपासून ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato बंद करणार आहे. खासकरुन हा निर्णय कंपनीने कमी ऑर्डर आणि खराब कंज्युमर रिव्हूमुळे घेतला आहे. दुसऱ्यांदा झोमॅटोवर ग्रॉसरी सेवा बंद करण्याची वेळ आली आहे. तर गेल्याच वर्षात याची घोषणा करण्यात आली. जून महिन्यात पायलट ग्रॉसरी सेवा सुरु केली गेली. त्यावेळी कंपनीने निवडक मार्केटमध्ये फक्त 45 मिनिटांत ग्रॉसरी सेवा देण्याचे जाहीर केले होते.

जेव्हा देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला, तेव्हा कंपनीने या ग्रॉसरी सेवेची सुरुवात केली. कंपनीला असे वाटत होते की, ग्रॉसरी डिलिव्हरीला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला जाईल. पण तसे न झाल्यामुळे ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटोचे असे म्हणणे आहे की, फूड डिलिव्हरीच्या उद्योगातून बाहेर पडून आपल्या फूड डिलिव्हरी उद्योवर लक्ष्य केंद्रीत करु पाहत आहेत.

कंपनीने असे म्हटले की, त्यांना विश्वास आहे ग्रोफर्समध्ये करण्यात आलेली गुंतवणूक त्यांना फायदेशीर ठरणार आहे. अशातच कंपनीने आपल्या स्वत:च्या ग्रॉसरी सेवेला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. झोमॅटो कडून 100 मिलियन युएस डॉलर म्हणजेच जवळपास 745 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. याच प्रकारे झोमॅटोने ग्रोफर्समधील सुद्धा काही भाग खरेदी केला आहे.

दरम्यान, आपल्या एक्सप्रेस डिलिव्हरी मॉडेलवर झोमॅटो आपले पूर्ण लक्ष देणार आहे. त्यानुसार आता कंपनी अवघ्या 15 मिनिटांत खाद्यपदार्थंची डिलिव्हरी करणार आहे. त्याचसोबत मार्केटपेक्षा कमी किंमतीत ग्राहकांना फूडची डिलिव्हरी केली जाणार आहे. याबद्दल कंपनीने आपल्या ईमेल स्टेटमेंटमध्ये घोषणा केली आहे.