प्राण्यांमध्ये सुद्धा करोना डेल्टा व्हेरीयंटचा प्रादुर्भाव, वाढली चिंता

करोनाच्या डेल्टा व्हेरीयंटची दहशत जगात अजूनही कायम असतानाच आता नवीन चिंता निर्माण झाली आहे. करोनाच्या डेल्टा व्हेरीयंटची लागण आता प्राण्यांना झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जगभरातील कोविड तज्ञ हैराण झाले आहेत. मंगोलिया येथील उदमांजर ब्रिडिंग सेंटर मधील सात उदमांजराना डेल्टा संक्रमण झाल्याचे दिसून आले आहे. प्राण्यांमध्ये प्रथमच डेल्टा व्हेरीयंटचे संक्रमण आढळून आल्याचे नॅशनल सेंटर फोर जेनेटिक डिसीज तर्फे जाहीर करण्यात आले आहे.

ऑगस्ट मध्ये उदमांजर ब्रिडिंग सेंटर मध्ये करोना टेस्ट केल्या गेल्या त्यात सात उदमांजराना करोना डेल्टा व्हेरीयंटची लागण झाल्याचे समोर आले. या सर्व मांजरांना खोकला, नाक गळणे, डोळे चिकटणे अशी लक्षणे होती असे झु मधील अधिकाऱ्यांनी सांगितले. अर्थात आता ही सर्व मांजरे करोना निगेटिव्ह आली आहेत.मंगोलियात करोना डेल्टा संक्रमण देशभर फैलावले असल्याचे सांगितले जात आहे.