नवजात बाळाविषयी रोचक माहिती


कोणत्याही घरात नव्या बाळाचा प्रवेश आनंदउत्सव असतो. एका चिमुकल्या जीवामुळे अनेक आयुष्यात ख़ुशी प्रवेश करते. हा चिमुकला जीव आपल्या हातात विसावला कि हृदयाला काय आणि किती आनंद मिळतो, जीव कसा सुखावतो ही अनुभवण्याची गोष्ट आहे. बाळाला कसे वाढवावे, कसे सांभाळावे याच्या अनेक सूचना सुरु होतात पण याच नवजात बाळाविषयी अनेक मजेदार गोष्टी आपल्याला माहिती नसतात. त्याचीच ही माहिती

नवजात बाळाच्या शरीरात ३०० हाडे असतात आणि बाळ मोठे होत जाते तशी ती एकमेकांना जोडली जाऊन अखेरी त्याची २०६ हाडे बनतात. मुदतपूर्व जन्माला आलेली बाळे बहुदा डावखुरी असतात. त्याच्या शरीरात १ कप होईल इतके रक्त असते आणि बॅक्टेरीया संख्या शून्य असते. बाळांच्या दृष्टीला पहिले काही महिने फक्त काळा पांढरा रंग दिसतो आणि त्याच्या कानावर सतत पापी घेत राहिले तर बहिरेपणा येण्याचा धोका असतो. सात महिन्यापर्यंत बाळ एकाचवेळी श्वास घेणे आणि गिळणे या क्रिया करू शकते. मोठेपणी हे करता येत नाही.


पहिले चार महिने त्यांना मिठाची चव कळत नाही कारण त्यांची मूत्रपिंडे पूर्ण विकसित नसतात. नवजात बाळात कानाच्या आतला भाग पूर्ण विकसित झालेला असतो आणि वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार पहिली दोन तीन वर्षे बाळाला स्वप्ने पडत नाहीत. लहान मुलांचा मेंदू शरीरातील ग्लुकोजचा वापर अधिक करतो त्यामुळे ती अधिक काळ झोपेत असतात. आपण फक्त जिभेने चव ओळखतो मात्र अगदी छोट्या बाळांना तोंडाच्या प्रत्येक बाजूला स्वाद ओळखता येतो. मे महिन्यात जन्मलेल्या बाळांचे वजन अन्य महिन्यात जन्मलेल्या बाळांपेक्षा २०० ग्रॅम अधिक असते असे म्हणतात.


जपानमध्ये क्राईंग सुमो नावाची स्पर्धा होते. त्यात लहान मुलांना न मारता अथवा इजा न करता रडविणाऱ्या सुमोला बक्षीस दिले जाते. अमेरिकेच्या मिशिगन मधील महिलेला तीन मुले आहेत. त्याच्या जन्मतारखा आहेत ८ ऑगस्ट २००८, ९ सप्टेंबर २००९ आणि १० ऑक्टोबर २०१०. असेही सांगतात कि १९३८ ते १९६० या काळात जे फोटो काढले गेले त्यात ५० टक्के हिस्सा नवजात बाळांच्या फोटोचा होता.

Leave a Comment