सलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’चे ‘विघ्नहर्ता’ गाणे रिलीज


बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’मधील ‘विघ्नहर्ता’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचा टीझर काल शेअर करण्यात आल्यानतर आज लगेच गणेशोस्तवाचे औचित्य साधत विघ्नहर्ता हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.


विघ्नहर्ता हे सलमानच्या चित्रपटातील पहिले गाणे असून आपल्याला या गाण्यात गणपती उत्सवाचे सार पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या गाण्यात अभिनेता वरुण धवन देखील दिसत आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे गाणे शेअर केले आहे. हा व्हिडीओ शेअर करत अंतिमची सुरुवात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने, असे कॅप्शन सलमानने दिले आहे. हे गाणे पाहिल्यानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता लागली आहे.

सलमान खान आणि आयुष शर्मा पहिल्यांदाच ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’मध्ये मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सलमान खान फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.