राज्यसभेतील 6 रिक्त जागेसाठी 4 ऑक्‍टोबरला निवडणूक


नवी दिल्ली : महाराष्ट्रात काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसह राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 22 सप्टेंबर या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे, तर ही निवडणूक 4 ऑक्‍टोबरला होणार आहे आणि त्याच दिवशी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

दरम्यान, राजीव सातव यांच्या जागेवर काँग्रेस कुणाला पाठवणार? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मागच्या वेळी काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांची हुकलेली संधी परत मिळणार की राजीव सातव यांच्या जागी ओबीसी चेहऱ्याचाच विचार होणार अशी चर्चा सुरु आहे. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची नुकतीच महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष नियुक्ती करण्यात आली आहे.