या दिवशी रिलीज होणार प्रियंका चोप्राच्या ‘मॅट्रिक्स ४’ चा ट्रेलर !


बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये ही बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्राने स्वत: ची एक जागा बनवली आहे. सोशल मीडियावर प्रियंका सक्रिय असल्याचे दिसते. ती सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. लवकरच प्रियंका ‘मॅट्रिक्स ४’ या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. बऱ्याच काळापासून या चित्रपटाची प्रतिक्षा चाहते करत आहेत. एवढ्यात प्रियंकाने ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहिर केली आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रियंकाने पोस्ट शेअर करत ट्रेलर प्रदर्शनाची तारीख शेअर केली आहे. गोळी घेण्याची योग्य वेळ आली आहे. तिने चाहत्यांना लाल किंवा निळी या दोघांपैकी कोणतीही एक गोळी निवडायला सांगितली आहे. अमेरिकेच्या वेळेनुसार चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी सकाळी ६ वाजता रिलीज करण्यात येणार आहे. तर ही पोस्ट शेअर करत, आता तुम्हाला निवडायचे आहे, अशा आशयाचे कॅप्शन प्रियंकाने दिले आहे.


लाना वाचोव्स्की यांनी ‘मॅट्रिक्स ४’ या सायन्स फिक्शन चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती केले आहे. या चित्रपटात कियानू रीव्ह्स, कॅरी-अॅन मॉस आणि जडा पिंकेट स्मिथ यांनी या चित्रपटातील आधीच्या भागात काम केले आहे. ‘मॅट्रिक्स ४’ मध्ये आता याह्या अब्दुल-मतीन दुसरा, जेसिका हेनविक, जोनाथन ग्रॉफ, नील पॅट्रिक हॅरिस, प्रियंका चोप्रा आणि क्रिस्टीना रिक्की यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहेत.