नेहा कक्करच्या नव्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ


बॉलिवूड लोकप्रिय गायिका नेहा कक्कर, टोनी कक्कर आणि यो यो हनी सिंहचे नवीन गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे कांटा लगा, असे नाव असून हे गाणे रिलीज झाल्यानंतर काही तासातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

नेहाला कांटा लगा या गाण्यात गातांना पाहून तिचे चाहते आनंदीत झाले आहेत. यो यो हनी सिंग पुन्हा एकदा त्याच्या देसी अंदाजात दिसत आहे. मोहित गुलाटी दिग्दर्शित या व्हिडिओचे संगीत आणि गीत टोनीने लिहिले आहेत. आपण या आधीही नेहा, टोनी आणि यो यो हनी सिंगला एकत्र पाहिले आहे.

काही तासांपूर्वीच रिलीज झालेले हे गाणे 34 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या गाण्याची निर्मिती देसी म्युझिक फॅक्ट्रीने केली आहे. देसी म्युझिक फॅक्टरीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अंशुल गर्ग यांनी गाणे रिलीज झाल्यानंतर सांगितले की, प्रेक्षक काटा लगाची आतुरतेने वाट पाहत होते. आम्ही हे गाणे जगभरातील नेहा, टोनी आणि हनीच्या चाहत्यांना समर्पित करतो.